या मोर्चात सरपंच प्रमोद कुटे,गणेश केचे,प्रशांत देशमुख शैलेश ओहोळ यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.
टेंभुर्णी [ प्रतिनिधी:-] सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शेवरे गावाला आज दि. 01/03/2020 वार रविवार सायंकाळी सात वाजता सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रोसिजर चा भाग म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात ज्या ठिकाणी यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांचा आधार लिंक करून घेतले जाते त्याठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष एक तास त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक झाले आहे अशा शेतकऱ्यांना या वेळी स्वतः जिल्हाधिकारी साहेबांनी लिंक झालेल्या पावत्या दिल्या, गावातील आपले सरकार सेवा केंद्र चालक रवींद्र मस्के यांचीसुद्धा स्वतः साहेबांनी विचारपूस करून आधार लिंक ला काही अडचणी आल्यास तात्काळ कळवा असे सुद्धा सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी अत्यंत आपुलकीने शेतकऱ्यांची विचारपूस करत असताना कर्जमाफी झाल्यानंतर नवीन कर्ज घेणे कर्ज घटन करण्यासाठी काही अडचणी आल्यास प्रशासनाची संपर्क साधा असे अव्हाण या वेळी केले . त्याच बरोबर सोलापूर जिल्ह्याच्या आणि पुणे जिल्ह्याच्या बॉण्ड्री वर असलेले शेवरे गाव या गावाच्या विकासासंदर्भात सुधा साहेबांनी गावकऱ्यांशी चर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत माढा तालुक्याचे तहसीलदार चव्हाण रावसाहेब,टेंभुर्णीच्या मंडलाधिकारी लकडे मॅडम, तलाटी पी एस जाधव,डी वाय ढोकणे तलाठी शेवरे स्वप्नील सोनटक्के तलाठी परिते श्रावण भोये तलाटि कुर्डूवाडी महादेव लोंढे कोतवाल शेवरे उपस्थित होते यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता मस्के पाटील यांनी जिल्हाधिकारी साहेबांचा फेटा श्रीफळ व हार देऊन गावच्या वतीने सत्कार केला तसेच माननीय तहसीलदार चव्हाण रावसाहेब यांचाही सत्कार ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आला. यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव संतोष पाटील माजी सरपंच समाधान मस्के अमोल मस्के बापू पाटील अजित पाटोळे राहुल मस्के भाऊसाहेब रानमाळ नाना देवकर भागवत मस्के बाळू मस्के. यांच्यासह गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. या भेटीनंतर माननीय जिल्हाधिकारी शंभरकर साहेब यांचं गावातील शेतकऱ्यांनी तोंड भरून कौतुक केलं, महाराष्ट्र शासनाने केलेल्या कर्जमाफीचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांना मिळतो आहे की नाही हे पाहणं सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आणि आज दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकारी अनेक गावांना भेट देऊन कर्तव्यदक्ष पणा दाखवला त्याबद्दल शेतकऱ्यांनी अभिंनदण केले
0 Comments