माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे अप्पर तहसील कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याबाबत राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना, विविध संस्था, शालेय संस्था यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
टेंभूर्णी (प्रतिनिधी) :-टेंभुर्णी व परिसरातील 27 गावाचे ग्रामपंचायत अंदाजे लोकसंख्या 80000 हजार इतकी आहे हा भाग टेंभुर्णी परिसरात येत असून टेंभुर्णी पासून माढ्याला जाणे येणे करीता साठ ते सत्तर किलोमीटर अंतर जावे लागते त्यामुळे वेळ पैसा खर्च होत असून वेळेत कामे होत नाहीत त्यामुळे बऱ्याच लोकांकडे वाहने नाहीत आणि जे वाहने आहेत त्या वाहनाने गेल्या मुळे डिझेल जळत आहे टेंभुर्णी येथे अप्पर तहसिल कार्यालय झाल्यास नाह्क खर्च वाचेल व कामे वेळेत होतील तरी टेंभुर्णी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय व खरेदी विक्री कार्यालय सुरू कारवे अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.टेंभुर्णी भागातील 27 ग्रामपंचायत, जि प सोलापूर, विवीध सामाजिक संघटना, सहकार संस्था, महिला बचत गट, शालेय शिक्षण संस्था यांनी एकूण 52 पत्रे दिली आहेत.यावेळी जि प सदस्या अंजनीदेवी पाटील, शिवाजीराव पाटील, माढा तालुका पंचायत समिती उपसभापती धनंजय जवळगे, पं स सदस्य वैभव कुटे, सामाजिक कार्यकर्ते गोरख देशमुख, बशीर जागीरदार, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे ,समीर सलगर, माढा तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष धनंजय मोरे ,महेंद्र वाकसे, महिला बचत गटाच्या अध्यक्ष स्वाती पाटील, टेंभुर्णी शहर उपप्रमुख प्रशांत सोनवणे, ताबंवे चे उपसरपंच नागेश खटके पाटील, कन्हेरगावचे राजेंद्र केदार, नगोर्लीचे चेअरमन रामदास खराडे पाटील सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment