एप्रिल, मे, जूनचे अन्नधान्य याच महिन्यात मिळणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 31, 2020

एप्रिल, मे, जूनचे अन्नधान्य याच महिन्यात मिळणार

एप्रिल, मे, जूनचे अन्नधान्य याच महिन्यात मिळणार

जिल्हा प्रशासनाकडून नियोजन: पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती



       सोलापूर दि. 31 :  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अन्न सुरक्षेच्या योजनेच्या लाभार्थ्यांना 10 एप्रिल पर्यंत अन्नधान्याचे वितरण केले जाईल. मे व जून महिन्याचे वितरण 11 ते 25 एप्रिल या कालावधीत करण्यात येणार आहे. तरी लाभार्थ्यांनी अन्न धान्य घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी उत्त्म पाटील यांनी केले आहे.

          केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटण्याचा निर्णय घेतला आहे. हे धान्य केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्यावर वितरीत केले जाईल. स्वस्त धान्य दुकाने दिवसभर सुरु राहणार असून त्यासाठी दुकानात विनाकारण गर्दी करु नये. स्वस्त धान्य दुकानदारांनी अन्न धान्य वितरण्‍ करतांना दोन ग्राहकांदरम्यान किमान तीन फुटाचे अंतर राहील याची काळजी घ्यावी, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

          जीवनावश्यकत वस्तूंचे उत्पादन, वाहतूक, वितरण, पणण आणि साठवणूक याबाबत नागरिकांच्या काही समस्या अथवा सूचना असल्यास त्याबाबत जिल्हा पुरवठा कार्यालयातील टोल फ्री क्रमांक 5019 यावर संपर्क करावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages