राज्यात एका दिवसात तब्बल 72 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांचा आकडा 302 वर... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 31, 2020

राज्यात एका दिवसात तब्बल 72 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांचा आकडा 302 वर...

राज्यात एका दिवसात तब्बल 72 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांचा आकडा 302 वर


मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 300 पार गेला (Corona Patient In Maharashtra) आहे. आज (31 मार्च) दिवसभरात नव्या 72 रुग्णांची नोंद झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे सर्वाधिक 59 रुग्ण, 2 रुग्ण पुण्याचे, 3 अहमदनगरचे, 2 ठाण्याचे, 2 कल्याण-डोंबिवलीचे, 2 नवी मुंबईचे तर 2 वसई विरारचे आहेत. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ही 153 वर पोहोचली आहे. तर राज्यातील संख्या ही 302 वर पोहोचली आहे.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, काल (31 मार्च) राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 220 होती. त्यात आज नव्याने 72 रुग्णांची भर पडली आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. ही वाढलेली आकडेवारी धक्कादायक आहे. यामुळे महाराष्ट्रात हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने ही धोक्याची घंटा समजली जात आहे.

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 220 वरुन 237 वर पोहोचला आहे. तर राज्यात आतापर्यंत दहा जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मुंबईत 7, नवी मुंबई, पुणे आणि बुलडाण्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला (Rise in Maharashtra Corona Patients) आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई - 97
पुणे - 34
पिंपरी चिंचवड - 12
सांगली - 25
नागपूर - 16
कल्याण - 9
नवी मुंबई - 8
अहमदनगर - 8
ठाणे - 5
वसई विरार - 4
यवतमाळ - 4
पनवेल - 2
सातारा - 2
कोल्हापूर - 2
बुलडाणा - 3
पालघर- 1
उल्हासनगर - 1
गोंदिया - 1
औरंगाबाद - 1
सिंधुदुर्ग - 1
रत्नागिरी - 1
जळगाव- 1
नाशिक - 1
इतर राज्य (गुजरात) - 01

एकूण 239

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई - 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) - 17 मार्च
मुंबई - 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) - 22 मार्च
*मुंबई - फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू- 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
मुंबई - 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) - 23 मार्च
मुंबई - एकाचा मृत्यू (1) -25 मार्च
नवी मुंबई - वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)- 26 मार्च
मुंबई - 63 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)- 26 मार्च
बुलडाणा - 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू - 28 मार्च
मुंबई - 40 वर्षीय महिलेचा मृत्यू - 28 मार्च
पुणे - 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू - 30 मार्च
मुंबई - 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू - 30 मार्च

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages