Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

कोरोनामुळे उद्भवलेल्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील लोकप्रतिनिधींपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या पगारात कपात करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 50 ते 25 टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे.
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. अशातच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेक लोक मदतही करत आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments