उंबरे पागे ता.पंढरपूर येथे रक्तदान शिबीर संपन्न
करकंब (ऋषिकेश वाघमारे) :- कोरोना या महासंकटाच्या पार्श्वभूमीवर मा.मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायत उंबरे पागे व जागरूक युवकांच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे काटेकोर पालन करीत उंबरे केंद्रशाळेच्या भव्य पटांगणात उत्कृष्टरितीने कँप संपन्न झाला.
सोशल डिस्टन्सींग राखत एकेक मीटर अंतरावर चौकोन आखले होते.कँपच्या ठिकाणी फोन करून एकावेळेस फक्त चौघांनाच प्रवेश दिला जात होता.
मा.ज्ञानदेवबापू कोरके व मा. भारतदादा वावरे यांनी रक्तदान करून शिबीरास सुरूवात केली.यावेळी ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
'यावेळी सर्व रक्तदात्यांना सँनिटायझर, हँडवाँश,मास्क असा सेट भेट देण्यात आला!'
उंबरे कर ग्रामस्थ सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.मागील महिन्यातच तब्बल ६५ जणांनी रक्तदान केले होते.
या कँपसाठी श्री.तानाजी व्यवहारे, श्री.अमर इंगळे, श्री.शहाजी मुळे, श्री.महादेव ढोबळे, श्री.चांगदेव अधटराव, श्री.हनुमंत भोसले, श्री.परशूराम अधटराव, श्री.संजय सुतार यांनी परिश्रम घेतले.
यावेळी पोलिस कर्मचारी पाटीलसाहेब, तलाठी आर.एन. चव्हाण, कृषी अधिकारी ढवळे भाऊसाहेब,चेअरमन ज्ञानदेव ढोबळे, उद्योगपती शामराव भोसले, श्री.गणेश ढोबळे,प्रहार अध्यक्ष यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले.

0 Comments