एकवीस मदत केंद्रातून 1900 जणांना निवारा
सोलापूर दि. 31 : लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे स्थलांतरीत मजूर आणि गरीब लोकांसाठी 21 मदत केंद्रे आणि निवारा गृह जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. या 21 निवारागृहामध्ये 1908 स्थलांतरीत लोकांची निवारा-यची व्यवस्था करण्यात आली आहे.
शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत निवास व भोजनाची सोय करण्यात आली आहे. निवारागृहांची संख्या 13 असून त्यामध्ये 836 स्थलांतरीत लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी कंपनीमार्फत 8 निवारागृह असून त्यामध्ये 1072 लोकांची व्यवस्था करण्यात आल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
राज्यात जाहीर केलेल्या संचार बंदीबाबत विविध आदेश जारी करण्यात आले होते त्याची मुदत आज अखेर होती. ही मुदत आता 14 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
0 Comments