कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी ; बालाजी समुहाकडून 85 लाख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 31, 2020

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी ; बालाजी समुहाकडून 85 लाख

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी ; बालाजी समुहाकडून 85 लाख


          सोलापूर दि. 31 : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी येथील बालाजी उद्योगसमूहाने ८५ लाख रुपयांची मदत आज जाहीर केली.   यापैकी मुख्यमंत्री सहायता निधीस  50 लाख, पीएम केअर्स निधीला 25 लाख तर तेलंगणा राज्य शासनाला दहा लाख रुपयांची मदत आज जाहिर केली. 

            बालाजी उद्योग समुहाचे प्रमुख श्री. राम रेड्डी आणि श्री. एन राजेश्वर रेड्डी यांनी आज पन्नास आणि पंचवीस लाख रुपयांचे धनादेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सुपुर्द केले. तेलंगणा शासनाला ऑनलाईन पैसे पाठवण्यात आल्याचे, श्री. रेड्डी यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे आदी उपस्थित होते.

          बालाजी उद्योग समूह औषध आणि खते निर्मिती याचबरोबर हॉटेल व्यवसायात कार्यरत आहेत. या समुहामार्फत सीएसआर निधीमधून विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages