दैनिक ‘सामना’ला पहिल्या महिला संपादक मिळाल्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, March 1, 2020

दैनिक ‘सामना’ला पहिल्या महिला संपादक मिळाल्या

दैनिक ‘सामना’ला पहिल्या महिला संपादक मिळाल्या ...


मुंबई सामनामधून शिवसेनेची राजकीय भूमिका, विचार प्रखरपणे मांडले जातात. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. सामनामध्ये लिहिले जाणारे अग्रलेख देशभरात चर्चेचा विषय असतात.  ९० च्या दशकात आपली राजकीय भूमिका, विचार महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या दैनिकाची सुरुवात केली. २३ जानेवारी, १९८९ रोजी मध्यरात्री ‘सामना’ दैनिकाची सुरुवात झाली. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, मोठ्या थाटामाटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले. “हिंदुत्वाचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी आणि दररोज होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी, सामना हे नवे शस्त्र असेल आणि उद्या पाळी आली तर, आम्हाला खऱ्या शस्त्रालाही हात घालावा लागेल” असे प्रकाशनाप्रसंगी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. 
यापूर्वी सामनाचे संपादकपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. पण उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. सामनाच्या संपादकपदामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने आता सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages