बागेचीवाडी जि.प. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
अकलुज ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागेचीवाडी ता. माळशिरस शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा जल्लोष 2020 हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला . जिल्हा परिषद माजी अध्यक्ष फत्तेसिंह व्यंकटराव माने पाटील ,गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, शिक्षण विस्ताराधिकारी नकाते साहेब, केंद्रप्रमुख सुधीर नाचणे बागेवाडीचे सरपंच सौ संगीता अवघडे, पोलीस पाटील. शंकर बागडे व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय गायकवाड, माजी उपसरपंच सरतापे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमापूजन, दिपप्रज्वलन करून रंगमंचाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक अभिमान गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या अंगी चे कलागुण आहेत त्याला वाव मिळावा म्हणून शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केंद्राचे केंद्रप्रमुख . सुधीर नाचणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये शाळेती बालकलाकारांनी व्यसनाधीनता अंधश्रद्धा यासारख्या सामाजिक समस्या तसेच सासु -सुन, नवरा- बायको ,यांच्या भांडणामुळे होणारे दुष्परिणाम, मोबाईलचा अतिवापर यासारख्या विषयावर नाटिका ,लोकगीते बालगीते देशभक्तीपर गीते, लिलिपुट, कोळीनृत्य, शेतकरी नृत्य, शेतकरी नृत्य ,स्केलेटन यासारख्या गीतावर केलेल्या बहारदार नृत्यानी रसिकांची मने जिंकून घेतली. या कार्यक्रमासाठी यशवंतनगर केंद्रातील सर्व शाळांचे शिक्षक ,मुख्याध्यापक, विविध संघटनांचे ,पतसंस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, प्रशासन अधिकारी, शिक्षक मित्र तसेच बागेवाडीच्या सरपंच उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका ,मदतनीस, माता पालक समिती, बागेवाडी येथील सर्व ग्रामस्थ ,पालक विविध मंडळाचे अध्यक्ष ,सदस्य तरुण कार्यकर्ते आदींची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी केलेल्या अप्रतिम नृत्य, नाटक, यांना प्रेक्षकांनी व मान्यवरांनी बक्षिसांचा वर्षाव करून प्रोत्साहन दिले. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांना गणेश एकतपुरे, गणेश डोळसे ,गणेश राऊत, गणेश कांबळे ,व सोमनाथ पोतेकर यांनी मिष्ठान्न भोजन यावेळी दिले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खडतरे सर, वाघ सर नष्टे सर, पवार सर , शिंदे सर, तसेच संतोष एकतपुरे ,अजय बनकर ,अजय लोखंडे ,विनोद गायकवाड,मंथन फुके, गणेश बनकर , संतोष गायकवाड , दत्तात्रय गायकवाड यांच्यासह गावातील सर्वच तरुण कार्यकर्त्यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान ढेकळे व लक्ष्मण वाघ व नष्टे यांनी केले तर आभार सिताराम ढेकळे यांनी केले.
0 Comments