Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड काढून घ्यावे - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड काढून घ्यावे -  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर


अकलूज( प्रतिनिधी ) प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून यामध्ये यादीतील प्रत्येक कुटुंबास प्रति वर्ष पाच लाख रुपयाचा उपचार मिळणार आहे .सध्या या योजनेचे गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम जिल्ह्यात सुरू आहे. तरी नागरिकांनी सदर कार्ड काढण्यासाठी ग्रामपंचायतीमधील सेवा केंद्र,  महा-ई-सेवा केंद्र येथे संपर्क साधून कार्ड काढून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे .ते वेळापूर येथील महा महा-ई-सेवा केंद्रात कार्ड वाटप करण्याच्या प्रसंगी बोलत होते .यावेळी उपविभागीय अधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजीत पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ .रामचंद्र मोहिते, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे ,आरोग्य कर्मचारी ,आशा गटप्रवर्तक ,आशा स्वयंसेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या .यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की 2011 साली झालेल्या आर्थिक जातनिहाय सर्वेक्षणातील लाभार्थींना गोल्ड कार्ड काढून देण्यात येत आहे. याची यादी संबंधित ग्रामपंचायत ,आशा स्वयंसेविका  यांचे कडे उपलब्ध आहे .हे कार्ड मिळाल्यानंतर निवडलेल्या हॉस्पिटलमधून प्रत्येक कुटुंबास वार्षिक पाच लाख रुपयाचे उपचार मिळणार आहे. माळशिरस तालुक्यातील 36604 एवढ्या कुटुंबांना व त्यातील 1,20021 येवढ्या लाभार्थींना सदरचे गोल्डन कार्ड प्राप्त होणार आहे. सदरची मोहीम ही आरोग्य कर्मचारी ,आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचेमार्फत जनजागरण करून गावपातळीवर ग्रामपंचायतीमध्ये राबविली जात आहे .या यादीमध्ये नाव वाढवण्याचा अधिकार कुठल्याही यंत्रणेला नाही .तरी सर्वांनी त्वरित गोल्डन कार्ड काढून घ्यावी. डॉ.रामचंद्र मोहिते ,तालुका आरोग्य अधिकारी, माळशिरस 
Reactions

Post a Comment

0 Comments