सांगोल्यातील जमजम शाही दालचा राईसची चवच न्यारी,व्यापाऱ्यांना देत आहे उत्कृष्ट न्ह्यारी. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 10, 2020

सांगोल्यातील जमजम शाही दालचा राईसची चवच न्यारी,व्यापाऱ्यांना देत आहे उत्कृष्ट न्ह्यारी.

सांगोल्यातील जमजम शाही दालचा राईसची चवच न्यारी,व्यापाऱ्यांना देत आहे उत्कृष्ट न्ह्यारी.

गौस बागवानचा जमजम शाही राईस ठरत आहे सुप्रसिद्ध. सांगोला (जगन्नाथ साठे) :-सांगोला येथील आठवडा बाजारात गौस बागवान हा तरुण  आपला भाऊ अल्ताफ बागवान याच्या मदतीने उत्कृष्ट जमजम शाही दालचा राईस बनवून जनावरांच्या आठवडा बाजारात व्यापाऱ्यांना उत्कृष्ट ,परिपूर्ण,व चवदार राईस देवून न्याहारी देत आहे.सहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या गौस ने लग्न समारंभ बर्थडे पार्टीला शाकाहारी,मांसाहारी दोन्ही पद्धती राईस बनवून दालचा राईसचा स्पेशालिस्ट  प्रसिद्ध पावत आहे. शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जमजम दालचा राईसला बाजारातील व्यापारी चव चाखण्यासाठी गर्दी करीत आहेत.गेल्या सात वर्षापासून गौस बागवान हा युवक उत्तम कॉलिटी आणि गुणवत्तापूर्ण दालचा देवून लोकांची जेवणाची गरज  भागवत आहे.अनेक व्यापाऱ्यांनी त्याच्या या उत्कृष्ट चवी बदल त्याचे कौतुक करीत आहे.   फक्त रविवार या दिवशी दहा कामगार गौसच्या मदतीला असतात.जवळपास दीडशे किलोचा  राईस 12 वाजेपर्यंत संपला जातो कोणताही व्यवसाय आत्मविश्वसाने केला की यश मिळतेच हा संदेश गौस देत आहे. आपल्या आईवडिलांचा आदर्श घेवून तो हा व्यवसाय करीत आहे.सर्व खर्च वजा होवून महिनाकाठी त्याला 30 ते 40 हजार नफा राहत असल्याचे गौस सांगतो,त्याच्या या प्रसिद्ध दालचा राइसची चव चाखायला आवर्जून यावे असे आवाहन ही त्याने केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages