पंचवटी येथील आरो पाणी फिल्टरचे उद्घाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 16, 2020

पंचवटी येथील आरो पाणी फिल्टरचे उद्घाटन


पंचवटी येथील आरो पाणी फिल्टरचे उद्घाटन

अकलुज ( प्रतिनिधी ) अकलूज ग्रामपंचायतीच्या वतीने पंचवटी अकलूज येथे आरो फिल्टर  पाण्याचा शुभारंभ शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील व जिल्हा परिषद सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सेस फंड 20% वाटा जलशुद्धीकरण सयंत्र बसवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या शितलदेवी मोहिते-पाटील यांचे प्रयत्नातून मिळाले आहे. सदरचे काम जवळपास तीन लाख रुपये असून आरो फिल्टर पाणी प्रीपेड आहे. त्यासाठी एक रुपये लिटर व पाच रुपये ला वीस लिटर पाणी मिळणार आहे. तसेच अकलूज शहरात सात ठिकाणी आरो फिल्टर बसवण्यात येणार आहेत अशी माहिती सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी दिली .नागरिकांनी फिल्टर पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करावा उन्हाळ्यात पाणी जपून वापरावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले .यावेळी अकलूज ग्रामपंचायतीचे उपसरपंच धनंजय देशमुख ,पंचायत समिती सदस्य हेमलता चांडोले, युवा नेते विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते-पाटील ,अकलूज ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल जगताप, आदित्य आर्वे, ग्रामविकास अधिकारी सुधाकर मुंगूसकर,माणिक इंगोले व सर्व ग्रामपंचायतीचे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages