शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरणास प्रारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 25, 2020

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरणास प्रारंभ


शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या  आधार प्रमाणिकरणास प्रारंभ



सोलापूर, दि. 24  :  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यतील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप आणि  माळशिरस  तालुक्यातील वेळापूर  येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करून करण्यात आला. मंद्रूप येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, तहसिलदार उज्ज्वला सोरटे, अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे, सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे, बँक आफ इंडियाचे विश्वास वेताळ उपस्थित होते. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज झाला. मंद्रूप येथील 104 तर वेळापूर येथील 194 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या याद्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर निर्गती केली जाईल, असे  अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी स्पष्ट केले. त्यांच्याहस्ते आधार प्रमाणिकरणाच्या पोच पावत्यांचे वितरणही  करण्यात आले. त्याचबरोबर नागुबाई कुंभार, भाग्यश्री कुमठाळे, पुंडलिक लोभे, सदाशिव जोडमुठे यांचा सत्कार करण्यात आला. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहु नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील 80 हजार 786 थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास 771.62 कोटी रूपयांची कर्जमाफी होवून हे शेतकरी कर्जमुक्त होतील. जिल्ह्यात एकूण 80786 शेतकऱ्यांपैकी 79311 शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड झाली असून 28 तारखेपर्यंत याद्या उपलब्ध होतील, असे जिल्हा उपनिबंधक भोळे यांनी सांगितले. जिल्ह्यात आज कर्जमुक्ती योजनेतंर्गत मंद्रूप आणि वेळापूर येथे पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा पथदर्शी योजना शासनाने हाती घेतली असून जिल्ह्यातील उर्वरित पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या याद्या 28 पर्यंत उपलब्ध केल्या जातील. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जातील, असेही ते म्हणाले


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages