मल्हारी गायकवाड जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
अकलूज ( प्रतिनिधी) शिव- मल्हार प्रतिष्ठान व वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रचे संघटक मल्हारी गायकवाड यांना मानाचा राज्यस्तरीय "शिव-मल्हार अभिनय कलारत्न जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . घरामध्ये कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना चित्रपट क्षेत्रात उत्तम प्रकारच्या भूमिका करून कलाक्षेत्रात काम करत , अंगी उपजत असलेल्या कलागुणांचा गौरव करून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक प्रा. मार्तंड साठे , काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय समन्वयक रवींद्र दळवी , यांच्या वतीने तसेच सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे(गुरूजी) यांच्या हस्ते तसेच निमगांव गावचे माजी सरपंच सुभाष साठे यांच्या हस्ते देण्यात आला. .
0 Comments