शेतकऱ्याला चिंतामुक्त करणारी सहज, सोपी कर्जमुक्ती योजना
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्याला चिंतामुक्त करणारी आहे, अशी प्रतिक्रिया आज मंद्रूप येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मंद्रूप येथे आज शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे कामकाज करण्यात आले . त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधल्यावर शेतकऱ्यांनी या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. महादेव कुंभार यांनी सांगितले की गावातील एक नंबर सोसायटी कडून कर्ज घेतले होते. आज माझे एका दिवसात आधारकार्ड प्रमाणिकरण झाले. भाऊसिंग चव्हाण यांनी सांगितले की मी कर्ज वेळेवर फेडत होतो. पण काही अडचणीमुळे कर्ज थकले. या शासनाने माझे पन्नास हजार रुपयाचे कर्ज माफ केले. गेल्यावर्षी प्रमाणे मला रांगेत थांबावे लागले नाही. ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे. सीताराम शिनखेडे यांनी सांगितले की, हि योजना सहज आणि सोपी आहे. या योजनेमुळे शेतकरी चिंतामुक्त होईल.
0 Comments