म. जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्‍या आधार प्रमाणीकरणास प्रारंभ- मोरगाव व सासवडला शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 25, 2020

म. जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्‍या आधार प्रमाणीकरणास प्रारंभ- मोरगाव व सासवडला शुभारंभ

म. जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्‍या आधार प्रमाणीकरणास प्रारंभ- मोरगाव व सासवडला शुभारंभ



पुणे, दि. 24: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पुणे जिल्‍ह्यातील सासवड आणि मोरगाव येथील पहिली यादी जाहीर झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 लक्ष 51 हजार 863 खाती अपलोड करण्‍यात आली  आहेत. त्‍यापैकी  निवडलेल्‍या दोन गावांतील  विशिष्‍ट क्रमांकासह कर्ज खाती 551 तर आधार प्रमाणीकरण झालेली खाती 271 असल्‍याची माहिती जिल्‍हा उप निबंधक अशोक कुंभार यांनी दिली. सासवड आणि मोरगांव येथे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण नोंद पावती कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे,  पुणे जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्‍हाण, सहायक निबंधक महेश गायकवाड, सहायक निबंधक हर्षिद तावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली असून  निवडलेल्‍या दोन गावातील पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध झाली आहे. ही यादी संबंधित बँक व ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. सासवड आणि मोरगाव या दोन्ही गावातील शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम सुरळीतपणे सुरु असल्‍याचेही कुंभार यांनी सांगितले.  प्रल्‍हाद तुकाराम खोमणे आणि बाळासाहेब गेनबा बोरावके या शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेच्या जलद अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त करुन शासनाला धन्यवाद दिले. दरम्‍यान, महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा राज्‍यस्‍तरीय शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  विधानभवनात झाला. त्यानिमित्त परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पुणे जिल्‍हाधिकारी कार्यालयात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगसाठी सहकार आयुक्‍त अनिल कवडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages