महापात्राने मारली बाजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखांतर्गत एकांकिका स्पर्धा
अकलूज/प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेमध्ये सोलापूर शाखेच्या महापात्राने बाजी मारत प्रथम क्रमांकासह अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन अकलूज शाखेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नियामक मंडळाचे सदस्य आनंद खरबस, दिलीप कोरके, यतिराज वाकळे, शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव शिवदास शिंदे, गणेश मुडेगावकर, व्यंकटेश सादूल, डॉ.विश्वनाथ आवड, परिक्षक रवि देवधर, संजय तोडकर, राजाभाऊ उराडे, धर्मराज दगडे, आनंद तोडकरी, सुनिल कांबळे यांच्यासह नाट्यरसिक उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये 7 एकांकिका सादर करण्यात आल्या. मुक्तीधाम एकांकिकेमध्ये पैशांच्या व नोकरीच्या मागे लागून हरविलेल्या नात्यांचा संबध वास्तवदर्शीपणे मांडण्यात आला. महापात्रा एकांकिकेमध्ये स्त्री असुनही स्मशानभुमीत प्रेत जाणणारी महिलेच्या जीवनावर अधारीत घडलेली हकीकत त्यातुन घरात उभा राहीलेला संघर्ष मांडण्यात आला. शड्डू एकांकिका ही कुस्तीवर आधारीत होती. यामध्ये रांगडू कहाणी मांडण्यात आली. सब्रान म्हणजे संयम. आजकालच्या मुला मुलीच्या मनात असलेली प्रेमाची व्याख्या किती चुकीची आहे हे मांडताना आपल्या अयुष्यात संयम किती महत्वाचा आहे हे सांगणारी एकांकीका सब्रानमधून मांडण्यात आली. वन सेकंड लाईफ यामध्ये गाडीच्या चाकाखाली आल्यानंतर काही क्षणच जीवंत राहणयाचे शिल्लक आसताना त्याकाळात पडलेल्या स्वपांनी रंजकता मांडण्यात आली. विविरमध्ये जातीभेदावर भाष्य करून सर्वधर्मसमभावशिवाय काही नाही हे दाखविण्यात आले तर कॉलिडोस्कोप ही एकांकिका नाते संबंधांवर आधारीत होती. निकाल खालीलप्रमाणे- प्रथम - महापात्रा (सोलापूर), द्वितीय - सब्रान (पंढरपूर), तृतीय - मुक्तीधाम (अकलूज), उत्तेजनार्थ - वन सेकंड लाईफ (सोलापूर महानगर), विवर (सोलापूर उपनगर). सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - प्रथम - राजेश जाधव (महापात्रा), द्वितीय - इम्तियाज मालदार (सब्रान), तृतीय - मुक्तीधाम (मुक्तीधाम). सर्वोत्कृष्ट अभिनय पुरूष - प्रथम - अजित साबळे (सब्रान), द्वितीय - डॉ.अविरा मोरे (वन सेकंड लाईफ) , उत्तेजनार्थ - मनोज वर्दम (मुक्तीधाम), डॉ.विद्याधर पवार - (वन सेकंड लाईफ). सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री- प्रथम - अपर्णा जोशी (महापात्रा), द्वितीय - एकता तुळजापूरकर (कॅलिडोस्कोप) ,उत्तेजनार्थ - राजनंदिनी सरवदे (भोकरवाडीचा शड्डू), पल्लवी दशरथ - (विवर), श्रद्धा राऊळ - (विवर).
0 Comments