Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर लोकसभा आपण लढवू : लक्ष्मणराव ढोबळे

सोलापूर लोकसभा आपण लढवू : लक्ष्मणराव ढोबळे



पंढरपूर येथे संतांचा मेळावा होणार आहे. कार्यक्रमाची माहिती सांगण्यासाठी माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पंढरपुरातील विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. ढोबळे म्हणाले, खा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याबाबतची चर्चा कानावर येत आहे, परंतु खासदार स्वामी हे उच्च न्यायालयात जाणार आहेत. या प्रकरणात अपिलावर अपील होणार आहे. यामुळे हे प्रकरण शिथील होणार आहे. आणि जर निवडणूक लागण्याची वेळ आलीच अन् पक्षाने आदेश दिले तर आपण सोलापूर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.








Reactions

Post a Comment

0 Comments