उदयनगर येथील जि. प.शाळेतील फेस्टिव्हल उत्साहात
अकलूज (प्रतिनिधी) उदयनगर (चौडेश्वरवाडी)येथील जि. प. शाळेतील फेस्टिव्हल मोठया उत्सवात संपन्न झाले. या वर्षीचे सांस्कृतिक कार्यक्रम शिवजयंतीचे औचित्य साधून साजरे करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तर अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी महालिग नकाते, यशवंतनगरचे केन्द्र प्रमुख सुधीर नाचणे, सरपंच संजय कडाळे, उपसरपंच, दत्तात्रय देशमुख, माजी सरपंच सतीश शिंदे, चांगदेव बाबर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विकास जवंजाळ, सचिन सोनवणे तसेच या कार्यक्रमासाठी तालुक्यातून विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग व गावातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी ही शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अशोक बनसोडे, बाळू लोखंडे, वंदना पाठणे व यास्मिन सय्यद यांनी परीश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजाबी जमादार यांनी केले. या शाळेच्यावतीने वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व इतर विविध कार्यक्रम राबविले जातात तसेच विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ही चांगली दिसून येते त्यामुळे शाळेतील सर्व शिक्षकांना ट्राफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
0 Comments