अटीतटीच्या कुस्तीमध्ये अकलूजचा माऊली कोकाटे त्रिमूर्ती केसरीचा मानकरी
अकलूज( प्रतिनिधी )महाशिवरात्र यात्रा महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या त्रिमूर्ती चषक कुस्तीमध्ये अकलूजच्या माऊली कोकाटेने कोल्हापुरच्या अक्षय मंगवङेवर १० विरुध्द ० गुणांनी मात करत ञिमुर्ती चषक पटकावला.शंकरनगर येथील शिवतीर्थ आखाङ्यात उतरलेले दोन बलदंङ पैलवान, सुरुवातीच्या पंधरा मिनीटांत एकमेकांच्या पटाला लागण्याचा प्रयत्न, एकेरी, दुहेरी पटांच्या ङावांची देवाण घेवान होत असतानाच सुरुवातीची पंधरा मिनीटे संपली. नंतर कुस्ती आंतरराष्ट्रीय नियमांवर आली. कोल्हापुरच्या अक्षयने सुरुवातीपासूनच बचावाचा पविञा घेतला. तर माऊलीने आक्रमक होत कब्जा घेत पहील्या तीन मिनीटांत चार गुणांची कमाई केली. दुसऱ्या तीन मिनीटांची सुरुवात झाल्यानंतर माऊलीने आक्रमक होत अक्षयचा प्रतीकार मोङुन काढत आणखी सहा गुणांची कमाई करत ञिमुर्ती चषक पटकवला. माऊली कोकाटेला रोख ७१ हजार रुपयांचे बक्षिस माजी उपमुख्यमंञी विजयसिंह मोहीते-पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. उपविजेत्या अक्षयला रोख २५ हजार रुपये देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे बक्षिस रविंद्र शेंङगे (टेंभुर्णी) १५ हजार, चतुर्थ क्रमांक भैया चव्हाण (अकलूज) याला मुलांच्या २५ किलो गटामध्ये प्रथम शिवराज घोडके, व्दितीय आकाश वाघमोडे, २८ किलो गटात प्रथम मारूती खरात, व्दितीय रेहान खान, ३० किलो गटात प्रथम धनराज जमनीक, व्दितीय माऊली जाधव, ३२ किलो शुभम सोनवणे व्दितीय श्रीकांत शेगर, ३५ किलो गटात प्रथम औदुंबर बोडरे, व्दितीय श्रीनाथ करवर, ४० किलो गटात सौरभ विरकर, व्दितीय शुभम करे, ४५ किलो गटात सौरभ गोरड, व्दितीय राजाराम सुरवसे, ५० किलो गटात रामदास मगर, द्वितीय सचिन चौगुले, ५५ किलो गटात प्रथम किरण राणे, व्दितीय तुषार देशमुख, ६० किलो गटात प्रथम रोहित निटवे, व्दितीय आकाश चव्हाण, ६५ किलो गटात प्रथम हणुमंत शिंदे, व्दितीय बबलू नरळे, ७० किलो गटात संतोष गावडे, व्दितीय कुंडलिक बोडरे, ७५ किलो गटात दिपक गोपने, व्दितीय अविनाश भोसले, ८० किलो गटात प्रथम महदेव कचरे, द्वितीय किरण माने ८५ किलो गटात प्रथम आशिष वावरे, द्वितीय बापु झंजे यांनी यश संपादन केले. ३० किलो वजन गटात वेदिका शेंडे (प्रथम), क्षितीजा गायकवाड (द्वितीय),३५ किलो वजन गटात श्रावणी लवटे (प्रथम), आकांक्षा जाधव (द्वितीय), ४० किलो वजन गटात ज्योती तांदळे (प्रथम), श्रेया मांडवे (द्वितीय), ४५ किलो वजन गटात जान्हवी गोडसे (प्रथम), सुचिता लोहकर (द्वितीय), ५० किलो वजन गटात सानिका पाटील (प्रथम), आरती घोरपडे (द्वितीय), ५५ किलो वजन गट अंकिता जाधव (प्रथम), सानिया पलंगे (द्वितीय), ६० किलो वजन गट गितांजली कोळेकर, सलोनी जगदाळे (द्वितीय), ६५ किलो वजन गट राधिका चव्हाण, गितांजली पांढरे (द्वितीय) यंनी यश संपादन केले. विजेत्यांना सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहीते-पाटील, मदनसिंह मोहीते-पाटील, धैर्यशिल मोहीते-पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सदरच्या स्पर्धा सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती, महाशिवराञ याञा महोत्सव समिती व प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. चौकट - पुढील वर्षी २ लाखांचे बक्षिस ञिमुर्ती चषकाची वाढती लोकप्रियता पाहुन जयसिंह मोहीते पाटील यांनी पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेतील विजेत्यासाठी २ लाख १ हजार, उपविजेत्यास १ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले. मुली व महीलांच्या कुस्तीसाठी धैर्यशिल मोहीते-पाटील यांनी भरघोस वाढ करण्याचे आश्वासन दिले.
0 Comments