दुचाकी चोर एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
सोलापूर* -एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरास अटक करून त्याच्याकडून चोरीची दोन दुचाकी वाहने जप्त केली आहे.वाहन चोरी करणारा इसम राजकुमार खंडु पाटील वय.२० वर्षे,रा.कोंड्याल शाळेजवळ ,नितीन नगर ,एम.आय.डी.सी.सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याचे कडून त्याने चोरी केलेले दोन्ही वाहने असा एकुण २५,००० रु.कि.चा मुद्देमाल जप्त केला आहे व आरोपीस अटक करण्यात आली आहे. एम.आय.डी.सी.पो.ठाणेचे पो.ना.२७५/रूपनर यांना चोराबाबत गुप्त माहिती मिळाली.त्यांनी माहीतीचे आधारे व.पो.नि.सूर्यकांत पाटील यांना कळविले. त्यानंतर गुप्त माहीतीचे आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे Api खांडेकर ,पो.स.ई.माळी व पथकाने चोरी गुन्ह्यातील दोन मोटार सायकल असा एकुण २५,००० रु. कि. चा मुद्देमाल जप्त केला आहे व आरोपीस अटक करण्यात आली आहे.
0 Comments