Hot Posts

6/recent/ticker-posts

२६- ११ चे हिरो, मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस आयुक्त (पैलवान )अशोक कामटे यांची आज जयंती ...


२६- ११ चे हिरो, मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस आयुक्त (पैलवान )अशोक कामटे यांची आज जयंती ...

सर्व जगाला माहिती आहे अशोक  कामटे सर हे एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी होतेपण बर्याच जणांना माहित नाही ते एक नावाजलेले ''पैलवान'' होतेत्यांचे मुळ गाव पुण्याजवळचे चांबळी,तालुका पुरंदर.त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९६५ज्या पुरंदर ने शिवरायांना हजार हातांचे बळ देवून स्वराज्य वाचवले ,मुरारपंतासारखा एक वाघ दिला ,त्याच खोर्यात याही वाघाचा जन्म झाला.शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील गाव गाव त्यावेळी पैलवान होते ,त्यातलेच हे गाव चांबळी.गावाला कुस्तीची परंपरा हि वारसा हक्कातच मिळाली होतीत्यांचे वडील भारतीय सैन्यात कुस्तीगीर होते,त्यांची नेमणूकच कुस्ती या खेळातून होती.जेव्हा ते सैन्यदलातून निवृत्त झाले तेव्हा ते कर्नल होते..कर्नल एम.आर.कामटेतर अश्या कुस्तीच्या समृध्द परंपरेत जन्मलेले अशोक कामटे लहान पनापासूनच तालमीत कुस्तीचे धडे गिरवत मोठे झाले,तरुण वयातच त्यांनी बर्याच नामांकित मल्लांना चित केले होतेज्या तांबड्या मातीत ते लहानाचे मोठे झाले ,ज्या पुरांदाराकडे पाहत लहानपण संपून तारुण्य आले हे सर्व त्यांना सांगत होते..कि आपल्याला काहीतर विलक्षण मोठे करून दाखवायचे आहेयाच एका जिद्दीने त्यांनी १९८९ सालच्या भारतीय पोलिस दल आय.पी.एस.(I.P.S.) वर्गामध्ये अधिकारी पद प्राप्त केलेत्यानंतरचा त्यांचा प्रवास म्हणजे एका चित्रपटातील महानायकाप्रमाणे आहे.. त्यांची कारकीर्द पुढील प्रमाण...



1989: भारतीय पोलिस अधिकारी
1991: भंडारा जिल्ह्याचे सहायक पोलिस अधिक्षक
1994: सातार्याचे पोलिस अधीक्षक
1997–1999: ठाणे ग्रामीणचे  पोलिस अधीक्षक
1999–2000: यु.एन.मिशन बोस्निया,.
2000–2002: डेप्युटी पोलिस आयुक्त (कमिशनर ) मुंबई
2002–2004: सांगलीचे जिल्हा पोलिस अधिक्षक, ( प्रमुख )
2004–2005: कोल्हापूरचे जिल्हा पोलिस अधिक्षक, ( प्रमुख ),
2006–2008: पोलिस आयुक्त (कमिश्नर) सोलापूर शहर,
June 2008 –ते November 2008: अतिरिक्त पोलिस आयुक्त(कमिश्नरमुंबई,
1995: विशेष सेवा पदक -नक्ष्लिते विभाग
1999: यु.एन.पदक ,
1999: विदेष सेवा पदक यु.एन.विभाग ,
2004: Awarded Director General's insignia,
2005: आंतरिक सुरक्षा पदक ,
2006: पोलिस मेडल(Police medal)
. पदे आणि विजय चाशाके मिळवलेले हे गृहस्थ अक्षरश एक कुस्तीगीर होते याचा विसर आज महाराष्ट्राला पडला आहेअहो हि तांबडी माती फार विलक्षण असते..त्यांना अन्यायाची प्रचंड चीड फार होते..आणि यातूनच एक विलक्षण इतिहास घडतो...त्यातील एक सुवर्ण इतिहास म्हणजे ...स्व.पैलवान.अशोक कामटेज्या अतिरेक्यांनी त्यांना गोळ्या घातल्या मी सांगतो नक्कीच ते सुध्दा क्षणभर स्तब्ध झाले असतील अशी शरीर यष्टी होती त्यांचीत्यांच्या पोलिसी कारकिर्दीत कित्येक भ्रष्ट राज्यकर्त्यांशी प्रत्यक्ष भांडायला सुध्दा ते मागे हटले नाहीत...याची माहिती प्रत्येक जिल्ह्यातील लोकांना असेलच...त्यातल्या त्यात सोलापुराकाराना .
कित्येक माजलेल्या गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या राजकर्त्यांचा विरोध डावलून त्यांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.


Reactions

Post a Comment

0 Comments