सोलापुरात सोमवार पासून रुक्मिणी जत्रेचेआयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 15, 2020

सोलापुरात सोमवार पासून रुक्मिणी जत्रेचेआयोजन

सोलापुरात सोमवार पासून रुक्मिणी जत्रेचे आयोजन 

सोलापूर, दि. 15- ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे 17 ते 23 फेब्रुवारी दरम्यान रंगभवन जवळील वोरोनोको प्रशालेच्या मैदानावर पुणे विभागातील महिला स्वयंसाह्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ‘रुक्मिणी जत्रा’ आयोजित केली असल्याची माहिती  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी दिली.  या जत्रेमध्ये पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर  जिल्ह्यातील महिला बचत गटांचा समावेश आहे.  महोत्सवाचे उद्घाटन सोमवार 17 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, खासदार जयसिध्देश्वर महास्वामी, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर,  जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर,  ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी  उपस्थित राहणार आहेत.  प्रदर्शनास  नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही श्री. संचालक नवाळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages