सहयाद्री फार्मसी कॉलेज येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 15, 2020

सहयाद्री फार्मसी कॉलेज येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

सहयाद्री फार्मसी कॉलेज येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न  


सहयाद्री फार्मसी कॉलेज मेथवडे या महाविद्यालयात शिक्षक व माजी विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद घडावा व त्यांचा शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात या माजी विद्यार्थी मेळाव्याची सुरुवात डॉ. प्रल्हाद वांगीकर, डायरेक्टर प्री क्लिनिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (प्रॅडो) पुणे, नंदकुमार लिमये, व्यवस्थापक, औषधनिर्माण विभाग, यु. व्ही. आयुर्जन फार्मा पी.व्ही.टी.एल.टी.डी. सातारा, सौ. इला वांगीकर, सुभाष जालनेकर, निवृत्त शाखा प्रमुख, बँक ऑफ हैदराबाद, नांदेड, मिनाक्षी जालनेकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलिपकुमार इंगवले सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील, सहयाद्री कॉलेज ऑफ फार्मसी अल्युमिनी असोसिएशनचे अध्यक्ष, प्रा. भारत गरंडे  यांच्या हस्ते व सर्व उपस्थित माजी विद्यार्थी व प्राध्यापकवृंद यांच्या उपस्थितीत सरस्वती पुजन व द्विप प्रज्वलनाने झाली. 
डॉ. प्रल्हाद वांगीकर यांनी क्लिनिकल रिसर्च हे औषधनिर्माणशास्त्राचे एक महत्वाचे भाग आहे की ज्यामुळे वेगवेगळी औषधे आपण तयार केली. काळानूसार अतिशय भयंकर रोग जसे की कॅन्सर, डेंग्यु, स्वाईन फ्लु, व इतर अनेक जिवांचे बळी घेत आहेत. त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी औषधनिर्माणशास्त्र संशोधन प्रयोगशाळेमध्ये औषधनिर्माता नवीन नवीन औषधे तयार करण्याचे काम अविरत पणे करतात. त्यांच्या या संशोधनामुळे या भयंकर रोगांना आळा घालणे शक्य झाले आहे. या मध्ये फार्मासिस्ट व नवीन औषध प्रयोग करण्यासाठी विविध वापरलेले जाणारे विविध प्राणी यांचे भरीव योगदान आहे. या संशोधनामध्ये औषधनिर्मात्यास भरपूर संधी आहे. की ज्यामुळे त्यांचे फक्त भविष्यच उज्वल न होता त्यांच्या हातून समाजकार्य होणार आहे. औषधनिर्माणशास्त्र हे एक अतिशय भविष्य उज्वल करणारे एक क्षेत्र आहे. अनेक रोग व वाढती लोकसंख्या यामुळे हे क्षेत्र झपाटयाने विकसित होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात करीअरच्या विद्यार्थ्यांना भरपूर संधी आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले.नंदकुमार लिमये, व्यवस्थापक, औषधनिर्माण विभाग, यु. व्ही. आयुर्जन फार्मा पी.व्ही.टी.एल.टी.डी. सातारा, यांनी औषधनिर्माणशास्त्र कंपनीमध्ये औषधे कशी तयार केली जातात. तसेच औषध निर्मितीमधील नवनवीन संशोधनाबद्दल सविस्तर माहीती दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल विस्तृतपणे सांगितला. तसेच उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे आभार मानून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपले महाविद्यालयाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाने अद्यावत प्रयोगशाळा, उपकरणे, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग व इतर सेवा सुविधा पुरविल्यामुळेच आम्ही या क्षेत्रामध्ये यश संपादन करु शकलो तसेच याचा शिकत असलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सह्याद्री फार्मा बुलेटीन -2019 चे प्रकाशन करण्यात आले. हे फार्मा बुलेटीन यशस्वी करण्यासाठी प्रा. मेघराज पाटील यांचे योगदान लाभले. या कार्यक्रमाची प्रस्थावना व सुत्रसंचालन प्रा. सौ पी. आर. ताटे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. मेघराज पाटील याने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहयाद्री कॉलेज ऑफ फार्मसी अल्युमिनी असोसिएशनचे अध्यक्ष, प्रा. बी. बी. गरंडे, प्रा. एम. ए. पाटील, प्रा. सौ पी. आर. ताटे यांचे व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages