देवदर्शनाला जात असताना वेळापूरजवळ अपघात ; पाच ठार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 1, 2020

देवदर्शनाला जात असताना वेळापूरजवळ अपघात ; पाच ठार

देवदर्शनाला जात असताना वेळापूरजवळ अपघात ; पाच ठार 

पंढरपूर ( सोलापूर )  वेळापूरजवळ शनिवारी ( ता.१ ) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास टँकर व कारचा अपघात झाला आहे. यामध्ये पाचजण जागीच ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेले सर्व वैराग ( ता.बार्शी ) येथील आहेत. वैराग येथील फलफले कुटुंबीय जेजुरी येथे सकाळी देवदर्शनाला जात होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. वेळापूर जवळ पुणे-पंढरपूर महामार्गावर कार आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या टँकरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात कार मधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. कार पुण्याहून वैराग कडे येत असताना हा अपघात झाला.अपघातातील सर्वजण सोलापूर जिल्ह्यात वैराग येथील आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गाडीत आठजण होते. त्यातील पाच जण ठार झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले. त्याच्यावर वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे. घटनास्थळी वेळापूर पोलीस दाखल झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages