Hot Posts

6/recent/ticker-posts

उत्कृष्ठ मार्गदर्शक पुरस्काराने सुनिल देवांग यांचा सन्मान


उत्कृष्ठ मार्गदर्शक पुरस्काराने सुनिल देवांग यांचा सन्मान






                
सोलापूर, -  बॅडमिंटन प्रशिक्षक-सुनील देवांग यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने गौरवण्यात आले. पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनी झालेल्या समारंभात देवांग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे आणि पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला  दहा हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने  देवांग यांची या पुरस्कारासाठी निवड केली.  देवांग गेल्या 25 वर्षे बँडमिंटनचे प्रशिक्षण देतात.  देवांग यांच्या बरोबरच राजेंद्र नारायणकर यांना  आणि हरिदास रणदिवे यांना क्रिडा संघटक म्हणून पुरस्कार देण्यात आला. इतर पुरस्कार गुणवंत विजेते खेळाडू पुढील प्रमाणे आकांक्षा रमेश शिरसट (धनुर्विद्या)वसंत दामाजी सरवदे (कुस्ती), राहुल सुरेश हजारे (हँडबॉल), निहाल सुनील गिराम (जलतरण -ड्रायव्हिंग‍), बिल्बा अनिल गिराम (जलतरण- ड्रायव्हिंग‍), दत्तात्रय केशव  वरकड (मैदानी खेळ)


Reactions

Post a Comment

0 Comments