उपळाई खुर्द व कापसेवाडीच्या विद्यालयात भरविले बाल आनंदी बाजार दोन्ही ठिकाणी झाली 41 हजार रुपयांची आर्थिक उलाढाल
माढा तालुक्यातील निमगांव ( टें) येथील श्री विठ्ठल शिक्षण संस्थेच्या उपळाई खुर्द येथील न्यू इंग्लिश स्कूल व कापसेवाडी- हटकरवाडी येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना कृतीयुक्त पद्धतीने व्यवहारज्ञानाचे धडे देण्यासाठी भरविलेल्या बाल आनंदी बाजारास ग्राहकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्यामुळे दोन्ही ठिकाणी जवळपास 41 हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे मुख्याध्यापक विलास बोराडे व औदुंबर चव्हाण यांनी सांगितले आहे. संस्थेचे मार्गदर्शक जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरवलेल्या उपळाई खुर्द येथील आनंद बाजाराचे उद्घाटन अॅड.सुरेश पाटील व शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष महादेव पाटील आणि मुख्याध्यापक विलास बोराडे यांच्या हस्ते तर कापसेवाडी येथे सरपंच अर्चना वैजिनाथ सदगर, माजी सरपंच राजेंद्र खोत, वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रशांत पलंगे, माजी उपसभापती उल्हास राऊत,ग्रामसेवक संदीप सावंत, केंद्रप्रमुख रोहिदास कापसे, मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण, चेअरमन वैजिनाथ व्हळगळ यांच्या हस्ते करण्यात आले. दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांनी भरवलेल्या आनंदी बाजारात शैक्षणिक साहित्य,पालेभाज्या,पॅटीस,फळभाज्या,भजी, वडापाव,पाणीपुरी,चहा,फळे, किराणा साहित्य,खमंग भेळ,गुलाब जामून,स्टेशनरी साहित्य खरेदीस ग्रामस्थ आणि महिलांमधून मोठा प्रतिसाद मिळाला. या दोन्ही ठिकाणी सोसायटीचे चेअरमन आण्णासाहेब पाटील, केंद्रप्रमुख विजय काळे,हसन तांबोळी,लहू लोंढे,तानाजी अनभुले,सौदागर टोणपे,कुबेरदास कदम,तुकाराम कापसे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,अनिल वाघमोडे,महादेव टोणपे, प्रविणकुमार लटके,शिवाजी भोगे,सुनील खोत,सचिन क्षीरसागर,सुधीर टोणगे,छाया राऊत,तनुजा तांबोळी,ञिशला साळुंखे,शुभांगी कदम,स्वाती पाटोळे,सतीश कदम,बाबासाहेब शिंदे,साहेबराव गवळी,आनंता बगडे,रोहिदास बगडे,विजय व्हळगळ,संपत खोत,माणिक कापसे,बालाजी खोत,दादासाहेब खोत,मच्छिंद्र व्हळगळ,गणपत व्हळगळ, वैजिनाथ सदगर,हरी जगताप, नामदेव पालेकर,बाळकृष्ण लटके,दयानंद गवळी,हनुमंत लटके,प्रभाकर कापसे,शांतीलाल बोबडे,अंकुश जगताप,लहू गवळी,सागर राजगुरू यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments