Hot Posts

6/recent/ticker-posts

पालकमंत्री वळसे-पाटील यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचे उद्घाटन


पालकमंत्री वळसे-पाटील यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचे उद्घाटन




                सोलापूर दि. 26 :  पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज शिवभोजन योजनेचे उद्घाटन करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकावरील कामत फूडस आणि साईतीर्थ भोजनालय येथे या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
                 यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिका आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते. सोलापूर शहरातील आणखी तीन ठिकाणी शिवभोजन योजना आजपासून सुरु करण्यात आल्याचे, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments