सोलापूर दि.26/01/2020 - 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील सर्व राष्ट्र पुरुषांच्या पुतळयास मा.महापौर व मा.पदाधिकारी तसेच विभागीय अधिकारी यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
26 जानेवारी भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इंद्रभुवन प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम मा.महापौर सौ.श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संबोधित करताना मा.महापौर म्हणाले की, भारत हे लोकशाही राज्य आहे लोकांचे लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपली राज्यघटना अंमलात आणली गेली म्हणून आपण आजच्या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा करतो. आपल्या देशाची गणना जगातील बलाढय देशामध्ये केली जाते. प्रजासत्ताक दिन म्हणजे लोकशाहीचा उत्सव त्यामुळे आज देशभर उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे यंदा 151 वे वर्ष आहे तसेच 73 व 74 व्या घटना दुरुस्तीचे रौप्य महोत्सवाचे वर्ष देखिल आहे हा एक चांगला योग म्हटले पाहिजे. लोकशाहीचे महत्व लक्षात घेऊन यापुढे होणा-या प्रत्येक निवडणूकीत मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभागी व्हावे तसेच इतरांनाही मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
चार हुतात्म्यांच्या असिम त्यागामुळेच सोलापूरला 17 वर्ष अधिक स्वातंत्र्य अनुभवायला मिळाले सोलापूर शहर हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा माझा मानस असून, त्या दृष्टीने मी पुढील काळात प्रयत्न करणार आहे. सोलापूर शहरात केंद्रशासन, राज्यशासन आणि महापालिका यांच्या निधीतून विविध विकासाची कामे सुरु आहेत. महापालिकेला नियमित कर भरणा-या लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देणे हि महापालिकेची जबाबदारी आहे. त्या दृष्टीकोनातून पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, चांगले रस्ते, विजेची सोय, आरोग्य सुविधा, उत्कृष्ट बागा, यांचे नियोजन पुर्वक कामकाज चालू आहे.
सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर असले पाहिजे यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. कचरामुक्तीसाठी घरोघरी घंटागाडी पाठविली जाते वौयक्तिक व सार्वजनिक शौचालयाच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्यात येत आहे. शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न असून, नागरिकांनी या कामात योगदान देण्याचे आव्हान मी या निमित्ताने करते. तसेच सोलापूर महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी उत्पन्नाची साधने वाढली पाहिजेत. नवनवे प्रकल्प कार्यान्वित झाले पाहिजे. करवसुली वेळेवर झाली पाहिजे मिळकतदारानी एक रकमी कर भरल्यास सवलत देण्याचे नियोजन केले आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच सोलापूर शहराचा विकास अधिक वेगाने आणि पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी आपण सर्वानी, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांनी मिळून प्रयत्न करुया.
तसेच सर्व कर्मचा-यांना महागाई भत्ता 6% पर्यत वाढ करण्यात येत आहे तसेच बालवाडी शिक्षिका सेविकांच्या मानधनात र.रु.500/- वाढ करण्यात येत असून, रोजंदारी कामगारांच्या पगारात रोज र.रु.10/- वाढ करण्यात येत आहे या वाढीनंतर सर्व अधिकारी, कर्मचारी जास्त मन लावून काम करतील अशी आशा बाळगते.
यानंतर आपापल्या विभागात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणा-या श्री.तुपदोळकर सिद्राम बुध्दप्पा, श्री.दत्तुसा विट्ठलसा कणगिरी, श्री.प्रभाकर अर्जुन पांढरे, श्रीमती.दनयंती दयानंद गायकवाड, श्री.ज्ञानेश्वर गणपत कांबळे, श्री.इम्रान ताजोद्दिन शेख, श्री.के.बी.तळीखेडे, श्री.श्रीशौल मिवळे, श्री.गोविंद जक्का, श्री.प्रकाश विट्ठल चंदनशिवे, श्री.रामलिंग रामण्णा चलवादी, श्री.किसन रामा धोत्रे, श्री.आनंद वसंत क्षिरसागर, श्री.गौतम दगडु वाघमारे, श्री.दत्ता बाबु प्रतिमे, श्री.शेटे.एन.आर, डॉ.सौ.मंजिरी श्रीकांत कुलकर्णी, श्री.उमेश गायकवाड आदिसह टि.पी.चार मंजूर अर्जानुसार सोलापूर महानगरपालिकेचे 53 मिळकतीचे अंदाजे 600 कोटी किमतीचे नावे 45 वर्षापासून न झालेले काम केल्याबद्दल श्री.किरण कांगणे नगर भूमापन अधिकारी यांच्यासह सर्वाचा याप्रसंगी यथोचित्त सत्कार मा.महापौर, मा.आयुक्त व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विजयकुमार कांबळे यांनी केले.
याप्रसंगी उपमहापौर राजेश काळे, सभागृहनेता श्रीनिवास करली, गटनेता आनंद चंदनशिवे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, अमोलबापू शिंदे, रियाज खरादी, यु.एन.बेरिया, नगरसेविका वंदना गायकवाड, मनिषा हुच्चे, निर्मला तांबे, रामेश्वरी बिर्रु, सौ.काकडे मॅडम, आदिसह मा.आयुक्त दिपक तावरे, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त अजयसिंह पवार, सहा.आयुक्त सुनिल माने, नगरअभियंता संदिप कारंजे, मुख्यलेखापाल शिरिष धनवे, आरोग्याधिकारी संतोष नवले, सार्व.आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, नगरसचिव ररुफ बागवान, प्रशासन अधिकारी शेख, अग्निशामक दल प्रमुख केदार आवटे, परिवहन व्यवस्थापक लिगाडे, मुख्य सफाई अधिक्षक संजय जोगदनकर सर्व विभागीय अधिकारी, आयुक्तांचे स्विय सहाय्यक राहुल कुलकर्णी, कामगार नेते अशोक जानराव, अंतर्गत लेखापरिक्षक विभागाचे मुंडेवाडी, सा.प्र.वि. कार्यालय अधिक्षक युवराज गाडेकर, भुमी मालमत्ता अधिक्षक सारिका आकुलवार, अभियंता सुनिता हिबारे, यु.सी.डी. विभागाचे आव्हाड मॅडम, आदिसह बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments