गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
अकलूज: श्री क्षेत्र आनंदी गणेश आनंदनगर- अकलूज याठिकाणी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळच्या सत्रामध्ये स. 8:00 ते 9:00 - महाभिषेक स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते- पाटील व शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
स. 9:00 ते 10:15 - मंगळवेढा महिला भजनी मंडळाकडून भजन.
स. 10:15 ते 11:45- कु. प्रियंका ठाकूर यांचे प्रवचन व भक्तिमय भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
स.11:45 ते 12:00- श्रीं ची मिरवणूक (दिंडी).
दु.12:00 ते 12:10- पुष्पवृष्टी.
दु.12:10 ते 12:30 पाळणा महिलावर्ग व कु. प्रियंका ठाकूर .
दु.12:30 ते 1:00 -महाआरती व महानैवेद्य.
दु. 1:00 ते 2:00 -महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. तरी गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे अकलुज ग्रामपंचायत चे सरपंच शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. दुपारच्या सत्रात दु. 4:30 ते 5:30 - या वेळात अनेक महिला एकत्र येऊन अथर्वशीर्षाचे पाठ घेण्यात येणार आहेत. यासाठी शिवशंकर बझार च्या चेअरमन स्वयंप्रभादेवी उदयसिंह मोहिते पाटील यांनी या अथर्वशीर्षा साठी अनेक महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments