दत्तात्रय गायके यांना आदर्श देवर्षि नारद दर्पण पुरस्कार प्रदान
कळंब (प्रतिनिधी) : पत्रकार दिनाच्या निमित्ताने कळंब परिसरातील गुणी पत्रकारांचा गुणगौरव व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक पुरस्कृत सेवा पुरस्कार समिती कळंब च्या वतीने यावर्षी चा आदर्श देवर्षि नारद दर्पण पुरस्कार येरमाळा येथील ज्येष्ठ पत्रकार सा. तेरणाकाठ संपादक दत्तात्रय गायके यांना संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे आयोजित कार्यक्रमात ( दि.8 जानेवारी) संजयजी आवटे, व अभय देशपांडे ( राजकीय विश्लेषक, ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा पुरस्कार समितीचे अध्यक्ष ह.भ.प महादेव महाराज आडसुळ हे होते. याप्रसंगी संजय आवटे यांनी कळंब तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक विविध उपक्रम राबवित आहेत याचे कौतुक केले यामुळे पत्रकार पुरस्कारामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना आणखीन जास्तीची प्रेरणा मिळेल, सामाजिक भान व जाणिवा ठेवून लेखन करीत आहेत त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळेल या कार्यक्रमास सतिस टोणगे, शितलकुमार घोंगडे, प्रताप आवाड, दिलीप गंभीरे, सौ सरस्वती आडसुळ, विलास मुळीक, अशोक शिंदे, बालाजी सुरवसे, माधवसिंग राजपुत, परमेश्वर पालकर, राजे सावंत, रमेश अंबिरकर, रमेश रितापुरे, हनुमंत पाटुळे, जगदिशचंद्र जोशी, जगदीश गवळी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डि. के. कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन माधवसिंग राजपूत यांनी केले
0 Comments