ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ जयंती साजरी

टेंभुर्णी (प्रतिनिधी):- टेंभुर्णी येथील ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये राजमाता, स्वामी विवेकानंद व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव नेहा गाडेकर व प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक गाडेकर सर व रेखा गाडेकर हे होते. शाळेतील कार्तिकी मिस्कीन, साक्षी लोंढे, सृष्टी बनसोडे, हर्षदा पिंगळे, तृप्ती कुठे, ओम साळवे, समर्थ खरसाडे, सुप्रिया चांदगुडे, साक्षी जाधव, अभिलाशा मिस्किन, शिवानी गाडेकर, संतोषी कुठे हे विद्यार्थी स्वामीविवेकानंद, लालबहादूर शास्त्री व राजमाता जिजाऊ भोसले यांचा वेश परिधान करून आले होते.हेच प्रमुख आकर्षण ठरले. संस्थेचे संस्थापक हरिश्चंद्र गाडीकर यांनी लालबहादूर शास्त्री व स्वामी विवेकानंद याचे विचार मांडले. प्रतिक खरात, अभिलाशा मिस्किन, प्रिया चांदगुडे, मुलांनी मराठी, हिंदी व इंग्रजी आपले मनोगत व्यक्त केले. जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्ष गाडीकर मॅडम यांनी जिजाऊंचे विचार आचरणात आणा अशी भावना मुलांना सांगितली. प्रतिक्षा सलगर इयत्ता आठवी हिने राजमाता जिजाऊवर तयार केलेली कविता म्हणून दाखवले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप साळवे, शुभम हवलदार, नूतन जाधव, दीपाली शीलवंत, अर्चना नाळे, देशमुख मॅडम, सरिता बनसोडे, डिंपल साळवे व स्वामी मॅडम,नितिन बनसोडे,स्वप्नील खरसाडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पाचवीतील गौरी नागणे व सातवीतील अंकिता जाधव या विद्यार्थिनीने केले व आभार इयत्ता नववीतील वैभव खरसाडे व सुमित सरडे यांनी मानले.
0 Comments