सहकार महर्षींनी शेतकऱ्यांना बलशाली बनवले- देवेंद्र फडवणीस
अकलूज (विलास गायकवाड) ज्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्याचा विकास झाला महाराष्ट्र राज्य प्रगतशील झाला त्यामध्ये अग्रस्थानी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आहेत. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बलशाली बनवले. पण सध्या शेतकरी ना चिंतामुक्त आहे ना कर्जमुक्त आहे. शेतकऱ्यांचा घात करण्याची मालिका सुरू आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी अकलूज येथील शेतकरी मेळाव्यात केले.
सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त विजय चौक अकलूज येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते ,आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, बबनराव आवताडे, जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे ,कल्याणराव काळे, शहाजी पवार, शिवानंद पाटील ,विजयराज डोंगरे, मदनसिंह मोहिते पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, स्वरुपाराणी मोहिते पाटील, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, मल्लिकार्जुन पाटील, धनंजय महाडिक, महागावकर,अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी,व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी देवेंद्र फडवणीस व चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पंचायत समिती माळशिरस यांच्या वतीने राबवण्यात आलेला विजयगंगा या दुसरा टप्पा प्रकल्पाचा शुभारंभ, शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ येथे सहकार महर्षी यांचा पुतळा अनावरण व एक मेगावॅट सोलर प्रकल्पाचे उद्घाटन, अकलूज ग्रामपंचायतीच्या वतीने बांधण्यात आलेले मच्छीमार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज येथील डाळिंब फळे मार्केटच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
पुढे बोलताना फडवणीस म्हणाले की मला मुख्यमंत्री म्हणून राज्यात काम करण्याची संधी मिळाली. पहिल्या पंधरा दिवसात मी जलशिवार योजना व जलसंधारण योजनेचा निर्णय घेतला.या जलयुक्त शिवार योजनेत लोकांनी सहभाग घेतला. या योजनेच्या माध्यमातून लोकांनी पाण्याची पातळी वर आणली. भांबुर्डी गावातील विजय गंगा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प राज्यातला सर्वात मोठा प्रकल्प ठरू शकेल. नवीन सरकार आलंय, नव्याची नवलाई चालू आहे. नव्याच्या नवलाईमध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे, याचा विचार न करता! जुन्या सरकारने केलेले वाईट म्हणून ते सगळं थांबवा... अशा प्रकारचा प्रयत्न चालू आहे. जलयुक्त शिवार या योजनेला स्थगिती दिल्याचे समजते पण हा प्रकल्प जनतेच्या मनातला प्रकल्प आहे. सत्तेची गणिते बदलत आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवून आपला फायदा करून घेण्याचा त्यांचा किमान समान कार्यक्रम आहे. साखर कारखानदारीवर बोलताना फडणवीस म्हणाले एकतीस रुपयांची मिनिमम सेविंग प्राईज या कायद्याचा अवलंब करीत नव्हते, मोदी साहेबांनीमुळे साखर कारखानदारी वाचली. साखर कारखाने बाबतीत मोदींनी चांगले निर्णय घेतले असे म्हणून त्यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेतील अडचणी केंद्रात जाऊन दूर करू असे आश्वासन उपस्थितांना दिले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाचा विकास कसा करता येईल याची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी रोवली आहे तर सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे भले केले.संपूर्ण भागाचा कायापालट केला. सहकार महर्षी यांनी आपल्या घराचा विकास न करता सहकारी साखर कारखाना ,सहकारी दूध संघ, कुकुटपालन संस्था अशा विविध संस्था उभ्या करून शेतकऱ्यांचा विकास केला. राजकारण बदलत आहे. बदलत असते, सत्तेत कोणी येत नाही, कोणी येते, गावा गावातील सहकारी चळवळ पक्की झाली आणि ते संघटित झाले तर आपल्याला खूप विकास करून घेता येतो. सहकार जागृत झाला तर सरकार कुठलेही असो काही फरक पडत नाही. असे ते म्हणाले.
प्रास्ताविकामध्ये माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पंचायत समिती माळशिरस यांच्या वतीने भांबुर्डी याठिकाणी करण्यात आलेला विजयगंगा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाची माहिती दिली.तसेच शिवामृत दूध उत्पादक संघाच्या१ मेगावॅट सोलर प्रकल्पाची माहिती देत दुग्ध संबंधित समस्या व्यक्त केल्या. यावेळी आभार अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी मानले.
0 Comments