जि.प.शाळा पाचेगाव बुद्रुक येथे आठवडा बाजार उत्साहात संपन्न
पाचेगाव बुद्रुक ता.सांगोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आठवडा बाजार भरवला.यात मोठी अर्थिक उलाढाल होऊन विद्यार्थ्यांनी व्यवहारी ज्ञानाचे धडे घेतले.नेहमीच विविध उपक्रम राबवणाऱ्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातच मुख्याध्यापक दिनकर घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडा बाजार भरवला.यामध्ये भाजीपाल्यांपासुन विविध खाद्य पदार्थ विक्री स्टॉल उभारण्यात आले होते.मकर संक्रातीच्या पार्श्वभुमीवर मोठ्या प्रमाणात भोगीची खरेदी करण्यात आली.पालकांनी व ग्रामस्थांनी बाजारास उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.विद्यार्थ्यांना नफ्या तोट्याचे गणित कसे असते ते या प्रात्यक्षिकाद्वारे पहावयास मिळाले.दौंड मॅडम,घोडके मॅडम,पाटील मॅडम,वाघ मॅडम,निंबाळकर मॅडम,बनसोडे गुरुजी,कांबळे गुरुजी व शालेय व्यवस्थापन समितीने विशेष परिश्रम घेतले.
0 Comments