Hot Posts

6/recent/ticker-posts

भंडीशेगाव येथील ड्रिम गार्डन ची तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी केली पाहणी

भंडीशेगाव येथील ड्रिम गार्डन ची तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी केली पाहणी



पंढरपूर/प्रतिनिधी; भंडीशेगाव ता पंढरपूर येथे ग्रामपंचायतीच्या 42एकर पडीक जमिनीवर एनटिपीसी च्या सहकार्याने सोलापूर सोशल फाउंडेशन, ड्रीम फाउंडेशन, ग्रामपंचायत ,वन विभाग,यांच्या माध्यमातून 42 एकर क्षेत्रावर 16500 हजार वृक्षांची लागवड केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी भंडीशेगाव येथील पडीक 42 एकर जमीन वृक्षारोपण करण्यासाठी दिली आहे.या ठिकाणी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख व अजित कंडरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले होते.या ड्रीम गार्डन वरती फळांची लागवड मोट्या प्रमाणात करण्यात आली आहे.ड्रीम गार्डन वरील वृक्षारोपण व इतर सोईसुविधा पाहण्यासाठी तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे यांनी पाहणी केली.
यावेळी या ड्रीम गार्डन वरील अतिक्रमण त्वरित काढण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.ड्रीम गार्डन च्या नियोजनबद्ध वृक्षारोपण ची तहसीलदार यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी पंचायत समिती सदस्य पल्लवी येलमार ,वर्षा येलमार ,माजी उपसरपंच संतोस ननवरे,ज्ञानेश्वर गिड्डे ,गणेश पाटील ,अभिजित कंडरे ,डॉ अनिल कंडरे,डॉ श्रीधर येलमार, सतीश रानखांबे ,आनंद येलमार ,संतोष येलमार ,रामहरी येलमार, रमेश शेगावकर ,प्रकाश यलमार सह ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ ते ड्रीम गार्डन हा रस्ता करून वारकरी निवासासाठी मोठी सोय होऊ शकते असे मत तहसीलदार वाघमारे यांनी यावेळी व्यक्त करून या रस्त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments