Hot Posts

6/recent/ticker-posts

उपशिक्षिका मंगल घोडके यांना सावित्रीबाई पुरस्कार


उपशिक्षिका मंगल घोडके यांना सावित्रीबाई पुरस्कार

परिवर्तन साहित्य सांस्कृतिक परिषद सांगोला यांच्या वतीने दिला जाणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार पाचेगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका मंगल घोडके यांना देण्यात आला.सांगोला तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महिला शिक्षकांना परिवर्तन साहित्य सांस्कृतिक परिषदेच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.या कार्यक्रमास दलितमित्र कदम गुरुजी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ.मीनाक्षी कदम,आयकर निरीक्षक मयूरी वाघमारे, नगराध्यक्षा राणीताई माने,रत्नप्रभा माळी,शोभा वाकळे आदी उपस्थित होते.या मान्यवरांच्या हस्ते मंगल घोडके यांना हा पुरस्कार देण्यात आला.कार्यक्रमात डॉ.मीनाक्षी कदम,मयूरी वाघमारे,रत्नप्रभा माळी यांनी विचार व्यक्त केले.परिषदेचे अध्यक्ष डॉ.विधीन कांबळे यांनी प्रास्ताविक केले.प्रा.जितेश कोळी यांनी सुत्रसंचालन केले.नागेश भोसले यांनी आभार मानले.गटशिक्षणाधिकारी संजय जावीर,विस्ताराधिकारी प्रदीप करडे,केंद्रप्रमुख मच्छिंद्र भोसले,मुख्याध्यापक दिनकर घोडके,भारती दौंड,कुसुम पाटील,वैशाली वाघ,सरिता निंबाळकर,प्रमोद बनसोडे,पंकज कांबळे या सहकारी शिक्षकांनी व शालेय व्यवस्थापन समितीने त्यांचे अभिनंदन केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments