प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या कामासाठी 80 लाख रूपयेंचा निधी मंजूर.. जि प सदस्या स्वातीताई कांबळे
सांगोला (प्रतिनिधी);. जिल्हा नियोजन समीती सोलापूर यांनी बिगर अनुशेष प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र देखभाल दुरुस्ती मुख्य लेखाशिष संकेतांक क्रमांक 2210.6716 या योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2019.20 या आर्थिक वर्षी करीता जिल्हा परिषद सोलापूर व आरोग्य समीतीच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी दुरुस्ती पेव्हींग ब्लॅक बसविणे इत्यादी मुलभुत सुविधा देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी 80 लाख रूपयेंच्या कामास प्रशासकीय मंजुरी दिली असल्यची माहिती सोलापूर जिल्हा शिक्षण. आरोग्य. नियोजन समितीच्या सदस्या स्वातीताई कांबळे यांनी दिली सदर कामास निधी मिळणेसाठी प्रमुख कार्यकर्ते. पदाधिकारी यांनी आमदार डॉ गणपतराव देशमुख. आमदार शाहाजीबापू पाटील.आमदार दिपक आबा साळुंखे पाटील माजी जि प अध्यक्ष जयमालाताई गायकवाड यांच्या कडे मागणी केली होती सदर मागणी नुसार जि प सदस्य गोविंद जरे.अतुल पवार. दादा शेठ बाबर.सचिन देशमुख.नुतन सभापती अनिल भाऊ मोटे.संगीता धांडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा निधी मंजूर करून घेतला आहे सदर निधी पैकी जवळा जिल्हा परिषद गटातील गावांसाठी मंजूर निधी वाकी घेरडी 4 लाख.आलेगांव 4 लाख.वाढेगांव 10 लाख.मांजरी 3 लाख .बामणी 3 लाख या प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला असुन कांही कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या असुन राहीलेल्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा.मेडशिंगी साठी ही निधी मंजूर करण्यात आला असुन लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येईल अशी माहिती जि .प. सदस्या स्वातीताई कांबळे यांनी दिली.
0 Comments