मुंबई येथे होणाऱ्या अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मनसे सैनिक सहभाग घेणार
सांगोला/प्रतिनिधी:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 23 जानेवारी रोजी नेस्को हॉल,गोरेगाव, मुंबई येथे होणाऱ्या एक दिवसीय महा अधिवेशनामध्ये सोलापूर जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने मनसे सैनिक सहभागी होणार असल्याचे मनसे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी सांगितले. ते बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी सांगोला शहरातील हॉटेल ज्योतिर्लिंग येथे सांगोला तालुका मनसे कार्यकारणीच्या बैठकीमध्ये बोलत होते.यावेळी, विनोद बाबर, तालुका अध्यक्ष अनिल केदार, मनविसे तालुका अध्यक्ष अविनाश बनसोडे, ता.अध्यक्ष सतीश दीडवाघ, ता.उपाध्यक्ष अक्षय विभुते, मनविसे ता.उपाध्यक्ष विकास गोडसे, मनविसे ता.उपाध्यक्ष ओंकार शिंदे, ता.उपाध्यक्ष महेश गोडसे, नितीन गोडसे, अमित बनसोडे, बापू माने आदी मान्यवर उपस्थित होते.प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे पुढे बोलताना म्हणाले या होणाऱ्या एकदिवसीय महा अधिवेशनामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनाला उपस्थिती दर्शवण्यासाठी प्रत्येकी तालुक्यातून 500 असे जिल्ह्यातून 5 ते 6 हजार मनसे सैनिक या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. तसेच मनसे हा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगोला तालुक्याच्या नवीन मनसे कार्यकरणीच्या सभासदांच्या निवडी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मनसे चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments