Hot Posts

6/recent/ticker-posts

लेबर पार्टीच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

लेबर पार्टीच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा


सोलापूर : लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मुख्य कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम महात्मा गांधी आणि शहिद भगतसिंग यांना ज्येष्ठ कामगार नेते कॉ.रा.गो. म्हेत्रस यांचेहस्ते पुष्पहार अर्पण करुन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांच्या समोर २६ जानेवारीच्या निमित्ताने कॉ.रा.गो. म्हेत्रस यांनी विचार मांडले की, सध्याच्या जातीवादी शक्तीच्या राजकरणामुळे भाराताचे संविधान हे धोक्यात आलेले आहे आणि या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने एक फार मोठी धोक्याची घंटा वाजलेली आहे. संविधानाचे पहिले वाक्य “आम्ही भारताचे नागरीक” हे वाक्यच नविन नागरीकत्वाच्या कायद्यामुळे हे वाक्य संपुष्टात आलेले आहे. ही घटना लोकांनी लोकांच्यासाठी समर्पित केले आहे असे असताना या नविन नागरीकत्वाच्या कायद्याची आवश्यकता नाही. या नविन कायद्याच्या विरुद्ध सर्व सुजान व घटनाप्रेमी लोकांनी संघटित होऊन आपला आवाज बुलंद केला पाहिजे आणि सरकारचा नागरीका-नागरीकात फुट पाडणारा हेतू बुडून काढला पाहिजे. यावेळी लेबर पार्टीचे प्रदेशध्यक्ष साथी बशीर अहमद यांनीही आपले विचार व्यक्त केले व सर्व कामगारांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे विचार व्यक्त केले. यावेळेस ज्येष्ठ कामगार नेते कॉ.रा.गो.म्हेत्रस, लेबर पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद, जिल्हाध्यक्षा सत्यव्वा गायकवाड, जिल्हा सेक्रेटरी अलका गायकवाड, शहराध्यक्ष कॉ.एजाज शेख, चंद्रकांत हंचाटे, महिला प्रमुख मंगला बनसोडे, कॉ. निहाल शेख, जहीर शेख, समीर शेख आदी उपस्थित होते. शेवटी कॉ. एजाज शेख यांनी आभार मानले. 
Reactions

Post a Comment

0 Comments