फरडवस्ती शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
पडसाळी ता.माढा जि.प.प्रा शाळा फरडवस्ती येथे 71 वा प्रजासत्ताक दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पडसाळी गावच्या सरपंच डॉ.सोनाली पाटील मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून मच्छिंद्र मुटकुळे साहेब ,पोलीस पाटील माळी मॅडम, संतोष पाटील हे होते. सर्व विद्यार्थ्यानी देशभक्ती पर गीतावर लेझीम कवायत, डंबेल्स कवायत, घुंगुरकाठी कवायत इ.चे.प्रात्यक्षिक सादर केले .तसेच यावेळी विविध प्रकारच्या स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले. संतोष पाटील यांनी सर्व शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. विद्यार्थ्यानी आपल्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. मुख्याध्यापिका श्रीमती ढगे मॅडम यांनी शाळेच्या सहशालेय उपक्रमाची माहिती दिली.यावेळी दत्ता फरड,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय फरड, भारत फरड,तात्या फरड याबरोबरच बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Comments