सामाजिक जाणिवेतून बँक ऑफ इंडियाने दिले सिव्हिलला लॅप्रोस्कोपिक मशीन - रमेश चंद्र ठाकूर
सोलापूर (प्रतिनिधी):- बँकिंग व्यवसाय करीत असताना सामाजिक जाणीव जपली पाहिजे म्हणूनच बँक ऑफ इंडियाने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात लॅप्रोस्कोपिक मशीन भेट दिली त्याचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे अशी माहिती बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीय बँकीग पश्चिम विभागाचे महाप्रबंधक रमेश चंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रारंभी सिव्हिल हॉस्पिटलच्या बी ब्लॉकमध्ये बँक ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आलेल्या लॅप्रोस्कोपिक मशीनचे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ.व्ही एम मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, बँक ऑफ इंडिया सोलापूर विभागाचे महाप्रबंधक अजय कडू, उपमहाप्रबंधक शैलेशचंद्र ओझा, रामचंद्र नारायण पवार आदी मान्यवर उपस्थित होेते.
संपूर्ण देशभरात आणि देशाच्या बाहेरही बँक ऑफ इंडियाने आपल्या व्यवसायाची व्याप्ती मोठ्याप्रमाणात वाढवली आहे. देशातील अग्रगण्य बँक म्हणून बँक ऑफ इंडियाची ओळख निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचा आर्थिकस्तर उंचावला पाहिजे म्हणून अनेक उपक्रम बँकेकडून दरवर्षी घेतले जातात त्याचाच हा भाग आहे सोलापूरसह इतर जिल्ह्यातील रुग्णांना या लॅप्रोस्कोपिक मशीनचा फायदा होणार असल्याचे राष्ट्रीय बँकीग पश्चिम विभागाचे महाप्रबंधक रमेशचंद्र ठाकूर यांनी सांगितले.
बँक ऑफ इंडिया सोलापूर विभागात सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, जालना, हिंगोली अशा 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. लोकाभिमुख बँकींग करण्याचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत बँकेच्या तसेच शासनाच्या योजना पोहोचवण्याचे काम बँकेकडून होत आहे. बँकींग व्यवसायासोबतच सामाजिक भानही ठेवले पाहिजे आणि सर्वसामान्यांना त्यातून लाभ मिळाला पाहिजे याच हेतुने बँक ऑफ इंडियाने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात लॅप्रोस्कोपिक मशीन भेट दिली आहे. सोलापूरसह इतर जिल्ह्यातील रुग्णांनाही याचा मोफतपणे लाभ घेता येणार आहे. बँक ऑफ इंडिया सोलापूर विभागाचे महाप्रबंधक अजय कडू यांनी यावेळी सांगितले.
शासकीय रुग्णालयात अनेक सुविधा आहेत त्यातच आता लॅप्रास्कोपिक मशीनची भर पडली आहे. गरीब रुग्णांना उपचारासाठी लाखों रुपये खर्च करावे लागत होते परंतु बॅक ऑफ इंडियाच्या वतीने ही मशीन सोलापूरला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो असे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत बँकेचे उपमहाप्रबंधक शैलेशचंद्र ओझा यांनी केले. त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नंतर या लॅप्रोस्कोपिक मशीनचे अनावरण झाले. यावेळी उपस्थित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनीही बँक ऑफ इंडियाचे हे औदार्य पाहून समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबंधक सचिनकुमार यांनी केले तर आभार उपमहाप्रबंधक शैलेशचंद्र ओझा यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रबंधक सचिनकुमार, गुलेच्छा यांनी अधिक परिश्रम घेतले.
0 Comments