रास्त भाव दुकान परवान्यासाठीअर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर दि .22 दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे घोडातांडा या गावात रास्त भाव धान्य दुकान चालविण्यास परवाना दयायचा आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी केले आहे. यासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज दक्षिण सोलापूर तहसीलदार कार्यालयात उपलब्ध असून सदरचे अर्ज 20 फेब्रुवारी 2020 पर्यंत स्विकारले जातील. रास्त भाव दुकान मंजूरीसाठी संबंधीत गाव पंचायत, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, सहकारी संस्था किंवा संस्था अधिनियम कायद्याच्या अंतर्गत नोंदणी असलेली संस्था किंवा महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांची प्राधान्यक्रमानुसार निवड करण्यात येईल. आवश्यक कागदपत्रासह 20 फेब्रुवारी 2020 च्या आत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी केले आहे.
1 Comments
9673769911
ReplyDelete