Hot Posts

6/recent/ticker-posts

जमिनीची विभागणी होणार सोपी

जमिनीची विभागणी होणार सोपी


सोलापूर दि 22 कुटूंबातील जमीनीची विभागणी करताना होणारा त्रास आणि विलंब कमी करण्यासाठी संमतीने अभिलेख पोटहिस्सा या पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहेयामुळे पोटहिस्सा विभागणी करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहेत्यानुसार कामकाज केले जाणार असल्याने नागरिकांनी अभिलेख अद्ययावत करण्यासाठी उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात संपर्क साधवाअसे आवाहनदक्षिण सोलापूरचे उप अधीक्षक किरण कांगणे यांनी केले आहे.शेतजमीनीची खातेफोड करून वाटप करताना सर्व हिस्सेदारांना समान प्रमाणात जमीन येण्यासाठी मोजणी केली जातेहे वाटप करताना कुटूंबातील कोणाचीही हरकत नसतेपण जमीनीची विभागणी करून सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट असल्याने अनेक कुटूंबातील जमिनीचे वाटप होऊ शकत नाहीही अडचण लक्षात घेऊन राज्याचे जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी  18 नोव्हेंबर 2019 रोजी संमतीने अभिलेख पोटहिस्सा याबाबतचे  परिपत्रक जारी करून ही प्रक्रिया सोपी केली आहेअशी माहिती श्रीकांगणे यांनी दिलीसंमतीने अभिलेख पोटहिस्सा प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी  करता कार्यालयातच केली जातेसर्वसंमतीने उपविभाग करावयाच्या या कार्यपध्दतीचे नामकरण संमतीने अभिलेख पोटहिस्साअसे करण्यात आले आहेपोटहिस्सा मोजणीच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाचे उपसंचालक श्याम खामकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन करण्यात आला होताजमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि त्यांचे एकत्रिकरण करणे अधिनियम 1947 मध्ये असलेल्या तरतुदीस अधीन राहून ही नवीन पध्दती अमलात येणार असल्याचे श्री चोक्कलिंगम यांनी आदेशात नमूद केले आहेया पध्दतीमुळे जास्त शेती क्षेत्र असलेल्या जमीनधारकांच्या विभागणी प्रक्रिया अधिक सहज सोपी होणार आहेअसे  श्रीकांगणे यांनी सांगितले.
प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे :-
• पोटहिस्सा करण्यासाठी सर्व सहधारकांची स्वाक्षरी असलेलेला अर्ज.
• भूमापन क्रमांकातील सर्व उपविभागाचे चालू तीन महिन्यातील सातबारा उतारे.
• धारण जमिनीचे पोटहिस्से दर्शक सहधारकांची स्वाक्षरी असलेला कच्चा नकाशा
• गाव नमुना क्रमांक 7/12 वेगळा झाला असल्यास गाव नमुना नंबर 6 मधील कच्चा नकाशा
• हा नकाशा उपलब्ध नसल्यास तलाठयांकडील प्रमाणपत्र
• या नकाशाप्रमाणे प्रत्येक भोगवटदाराच्या कब्जा वहिवाटीत असलेले अंदाजित क्षेत्र  अधिकार      भिलेखात असलेल्या क्षेत्राचा तपशिलसामायिक क्षेत्रात विहीरकूपनलिकावस्तीझाडे याचा तपशीलआ वश्यक.
भोगवटदारांची ओळख पटविण्यासाठी फोटो ओळखपत्राची स्वसाक्षांकित छायाप्रत,(आधार कार्डपॅनकार्डमतदान ओळखपत्रवाहन परवानापासपोर्ट  सरकारने दिलेले कोणतेही अधिकृत फोटो ओळखपत्र यांपैकी एक)

Reactions

Post a Comment

0 Comments