घेरडी -महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे वतीने सत्कार संपन्न
घेरडी गावचे सुपुत्र, प्रामाणिक पण तितकेच परखड व्यक्तिमत्व आदरणीय श्री.तानाजी चंदनशिवे सर अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके नाना यांची सांगोला तालुका पंचायत समितीच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती परिवाराच्या वतीने कौटुंबिक सत्कार त्यांच्या घरी संपन्न झाला. जिल्हा शाखेचे सल्लागार आदरणीय श्री.मुरलीधर गोडसे सर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यकार्याध्यक्ष श्री.राजेंद्र नवले सर, संघटनेचे मार्गदर्शक आदरणीय श्री.भारत कुलकर्णी सर, जिल्हा सरचिटणीस श्री.अमोगसिद्ध कोळी सर, जिल्हा संघटक आबासाहेब मेटकरी सर, तालुकाअध्यक्ष भारत लवटे सर, सरचिटणीस भागवत भाटेकर सर, उपाध्यक्ष अशोक गंगाधरे सर, तालुका सोसायटीचे माजी चेअरमन प्रमोद इंगोले सर, संचालक राहुल चंदनशिवे सर, अशोक सावंत सर, घेरडी केंद्राचे केंद्रसंघटक नामदेव चव्हाण सर , किशोर जाधव सर, किशोर होरंडीकर सर, सचिन कांबळे सर, दत्तात्रय शिंदे सर, सचिन चंदनशिवे सर, झेंडेकर सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तालुका अध्यक्ष श्री.भारत लवटे सर यांनी संघटनेच्या वतीने व सर्व प्राथमिक शिक्षकांच्या वतीने नानांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या कार्यास शुभेच्छाही दिल्या.
राज्य कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र नवले सर यांनीही नानांना शुभेच्छा देतानाच शिक्षकांचे , विद्यार्थ्यांचे , शाळांचे काही प्रलंबित प्रश्न व अडचणी त्यांच्या कानावर घातल्या.
सत्काराला उत्तर देताना आदरणीय नानांनी संघटनेच्या कामाचे भरभरून कौतुक केले. शिक्षण हा माझा आवडता विषय असून जे जे योग्य आहे,जे जे चांगले आहे ते करण्यासाठी मी जीवाचे रान करीन असा शब्द त्यांनी दिला.
कुठल्याही शिक्षकाला नाहक त्रास होणार नाही यादृष्टीने प्रशासकीय कामकाज करण्याची सूचना तालुका प्रशासनाला करणार असल्याचे सांगितले.आदरणीय आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना शिक्षण , विद्यार्थी व शिक्षकांचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.
शिक्षकांनी आपले शालेय कामकाज प्रामाणिकपणे वेळेवर करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सहावा व सातवा वेतन आयोग आणि सेवापुस्तकांच्या पडताळणी बाबत त्यांनी अतिशय ठोस भूमिका मांडली आणि याबाबतीत जी काही अनियमितता आहे ती दूर करण्यासाठी पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नानांचा एकंदरीत अभ्यास, त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि त्यांची तळमळ पाहता येणाऱ्या काळात शिक्षकांचे आणि शिक्षणाचे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न मार्गी लागतीलच, म्हणूनच नानांचा कार्यकाळ हा झंझावाती राहील यात शंकाच नाही.
0 Comments