नाझरे (दि.१८) माणदेशातील शेतकऱ्यांनी सातत्याने दुष्काळ परिस्थितीत लढा देऊन कमी पाण्यात डाळिंब पीक उभारले व ते परदेशात( युरोप) पाठविले. यापैकी वझरे(ता. सांगोला) येथील शेतकरी उत्तम (आबा)पवार असून एक उत्कृष्ट बाग कशी असावी याचे उदाहरण असून त्यांचा आम्हाला अभिमान आहे असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बागेच्या पाहणी प्रसंगी मत व्यक्त केले
एक बेरोजगार युवक आबा पवार यांनी अपार कष्ट घेऊन माळरानावर नंदनवन फुलविले व डाळिंब एक्सपोर्ट करून क्रांती घडविली व यासाठी आम्ही मान नदीत पाणी सोडून शेतकऱ्यांच्या बागा फुलविल्या यापुढे खासदार साहेब येथील शेतकरी कष्टाळू आहेत मान नदी कायम वाहती करा असे भाजपाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांनी सांगितले यावेळी खासदार व शेतकरी यांचा भव्य सत्कार करून बागेची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी वझरे ग्रामपंचायत मार्फत ही सत्कार करून वझरे ते दत्त मंदिर सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण करावे अशी मागणी केली त्यावर सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले तसेच पवार कुटुंबियांचा ही सत्कार करण्यात आला
सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार सांगोला अध्यक्ष आनंद फाटे सरपंच विनायक मिसाळ बंडू मामा आदाटे सुरेश यादव प्राचार्य के वाय पाटील अशोक पाटील वसंत पाटील संजय पाटील राजू पाटील मुकुंद पाटील बापू कोळवले भाऊ पाटील ओंकार देशपांडे प्रशांत कदम दीपक शिंदे अजय सरगर महादेव पवार लक्ष्मण वाघमारे बाबासो पवार बाबासो शिंदे निलेश जुंदळे नरसु निंबाळकर नागेश रायचूरे कृषी सहाय्यक एस एम खांडेकर पर्यवेक्षक हरिभाऊ शिरसागर शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी डाळिंब मार्गदर्शक आरिफ काझी ह्यांचा खासदार निंबाळकर यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन शिक्षक उत्तम सरगर तर आभार प्रा धोंडीराम पाटील यांनी मांडले.
0 Comments