Hot Posts

6/recent/ticker-posts

अरण च्या 71 शेतकऱ्यांनी पाहिले बारामती चे 'कृषक' प्रदर्शन

अरण च्या 71 शेतकऱ्यांनी पाहिले बारामती चे 'कृषक' प्रदर्शन

अरण प्रतिनिधी - बारामती येथील 'कृषक'कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी अरण येथील 71 शेतकऱ्यांची  ग्रामपंचायत यांच्यावतीने प्रदर्शन पाहण्यासाठी सहल काढण्यात आली.
सकाळी नऊ वाजता तम्मा शेळके व भारत पाटील यांच्या हस्ते हस्ते श्रीफळ वाढवून या अभ्यास सहलीला सुरुवात झाली.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पन्न वाढवावे.या सहलीचा खर्च ग्रामपंचायत च्या 14 व्या वित्त आयोगातून केला जाणार आहे.
            या वेळी जि प सदस्य भारत आबा शिंदे या पुढेही राळेगण सिद्धी,हिरवेबजार, अजनाळे या आदर्श गावांना भेटी चे ही आयोजन केले जाईल गावकर्यांनी त्याला प्रतिसाद द्यावा.
           सरपंच प्रतिनिधी पांडुरंग घाडगे,बालाजी टोनपे,यशवंत शिंदे,राजाभाऊ पाटील,सुभाष पाटील यांच्या सह 71 शेतकरी या सहलीत सहभागी झाले होते.
Reactions

Post a Comment

0 Comments