राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 19 जानेवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आली होती.
सोलापूर-- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 19 जानेवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ भावनाऋषी प्रसूतिगृह येथे महापौर श्रीकांचनाताई यन्नम यांच्या शुभहस्ते बालकांना पोलिओ डोस देऊन करण्यात आले.यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी प्रस्तुती गृहाची पाहणी केली आणि तेथे जन्मलेल्या बालकांना सुद्धा पोलिओचा डोस दिला. महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सोलापूरतील शहरवासीयांना आव्हान केले की आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रावरती जाऊन आपल्या घरातील 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस द्यावे असे म्हणाले. सोलापूर शहरातील 1 लाख 19 हजार 137 इतके बालक हे 0-5 वयोगटातील असून या सगळ्याना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. तसेच शहरात 365 केंद्रवार पोलिओचा डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 306 कर्मचारी व 46 अधिकारांची व्यवस्था करण्यात आले आहे.या कार्यक्रमास सह्यायक संचालक डॉ.अनिरुद्ध देशपांडे, आरोग्य अधिकारी संतोष नवले,शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे,कुटूंब कल्याण अधिकारी नामदेव सोडलं,डॉ.श्रद्धा सिरशी,वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवकांची चिप्पा ,डॉ अतिश बोराडे,प्रसाद पाटील,तसेच डॉक्टर व कर्मचारी आणि परिसरातील महिला उपस्थित होते.
0 Comments