श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकिय महाविद्यालय समस्यांकरीता वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे तात्काळ बैठक आयोजित करणार. आ. शिंदे
सोलापूर :- सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विविध समस्या जाणून घेण्याकरीता अधिष्ठाता कार्यालय येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत दि. 16 जानेवारी 2020 रोजी अधिष्ठाता, डॉक्टर व कर्मचारी यांच्या समवेत बैठक घेतली.
सोलापूरात बहूसंख्य नागरीक श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे विविध उपचाराकरीता येत असतात त्यांना अपु रया सोयी-सुविधा असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री निधी bariatric surgery, bariatric hub तयार करणे, गेल्या 5 महिन्यापासून वर्ग 4 च्या रोजंदारी कर्मचारयाचे वेतन देण्यात आले नाही, रुग्णालयातील बर्न वार्डामध्ये (ICU) सोयी-सुविधा पुरविणे, रुग्णालयात 50 ते 100 बेड नर्सिंग होमची सोय करणे, अपंग सर्टीफिकेट तालुक्यांमध्ये वितरीत करणे (उदा. पंढरपूर, मोहोळ इ.), रुग्णालयात रुबोटिक सर्जरी होणे गरजेचे आहे, रुग्णालयात ट्रोमा, बर्नर, NICU अत्याधुनिक सुविधा पुरविणे, रुग्णालयात प्याथलॅब असून त्यामध्ये डेंग्यूची तपासणी होत नाही, रुग्णालयात कर्मचारी, डॉक्टर्रांची संख्या कमी आहे, रुग्णालयात अॅन्टीरॅबीझ साठा जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यात यावे, रुग्णालयात कॅन्सरची शस्त्रक्रिया होते पण केमोथेरपी होत नाही, रुग्णालयात वेंटीलेटरची संख्या कमी आहे, रुग्णालयात नाविण्यपूर्ण योजनेमध्ये सुविधा पुरविणे, रुग्णालयाकरीता DPDC निधी उपलब्ध होत नाही. आदि सर्व विविध समस्या व डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध समस्या व इतर सोयी-सुविधांकरीता आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली
सदर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विविध समस्या व सोयी-सुविधा पुरविण्याकरीता तात्काळ वैद्यकीय शिक्षण, संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजित करणार असे सांगितले. यावेळी अधिष्ठाता संजय ठाकूर, डॉ. अग्रजा चिटणीस, डॉ. मस्के, डॉ. धडके व वैद्यकीय रुग्णालयाचे डॉक्टर, नगरसेवक बाबा मिस्त्री व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments