मंगळवेढा येथे प्लस पोलिओ मोहिम यशस्वीरित्या संपन्न.
मंगळवेढा- (जगन्नाथ साठे) लहान मुलांना सक्षम करण्यासाठी आणि पोलिओ मुक्त करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागामार्फत १९ जानेवारी रोजी मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या वेळी मंगळवेढा शहरातील सर्व न.पा.शाळा, ग्रामीण रुग्णालय,कुंभारे हॉस्पिटल येथे या लसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला या वेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रमोद शिंदे,वैद्यकीय अधिकारी डॉ निखिल जोशी,वैद्यकीय अधिकारी डॉ प्रविण माने, शल्यचिकिस्तच डॉ किरण पोटे,वैद्यकीय अधिकारी डॉ आहिरे, बाबुराव माने व सर्व कर्मचारी यांनी लहान बालकांना पोलिओची मात्रा दिली.
0 Comments